चातगाव येथील अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त

600

– महसूल विभागाची या महिन्यात तिसरी कारवाई
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १७ ऑक्टोबर : तालुक्यामध्ये होत असलेली अवैध रेती वाहतूकदारांना आळा घालण्यासाठी महसूल विभाग धानोरा यांनी पूर्णपणे कंबर कसली असून चातगाव परिसरामध्ये होत असलेल्या अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त केल्याची कारवाई महसूल विभागाने केली आहे.
यापूर्वी धानोरा येथील सालेभट्टी घाटावरून रितीचे ट्रॅक्टर पकडण्यात आले होते. त्या नंतर तुकूम रेती घाटावरून सुद्धा ट्रॅक्टर जप्त करण्यात आलेली होती. त्यानंतर ही तिसरी मोठी कारवाई आहे. या कारवाईतून महसूल विभागाने धाड टाकून सकाळी दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले.त्यामध्ये एम एच ३३ जे ३०७२ क्रमांकाची एक ट्रॅक्टर व दुसरी ट्रॅक्टर ज्यावर अजिबात नंबर प्लेट नाही. हे ट्रॅक्टर चातगाव येथील असल्याचे समजते. सदर दोन्ही ट्रॅक्टर तहसील कार्यालय धानोरा येथे जमा करण्यात आले आहे. सदर कारवाई धानोराच्या तहसीलदार लोखंडे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार वाळके व पुरवठा निरीक्षक नणंदनवार यांनी केली आहे. या कारवाईने मात्र अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here