शिक्षकांचा नवभारत साक्षरता प्रशिक्षणावर बहिष्कार

470

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १७ ऑक्टोबर : केंद्र शासनाअंतर्गत सत्र २०२२ ते २०२७ दरम्यान राबवण्यात येणाऱ्या नवभारत साक्षरता कार्यक्रमास मुरुमगाव येथे १६ ऑक्टोंबर ला दुपारी २.३० वाजता उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांनी केंद्रप्रमुख यांचे मार्फत गटशिक्षणाधिकारी धानोरा यांना बहिष्कार बाबतचे निवेदन सादर केले.
नवभारत साक्षरता कार्यक्रम प्रशिक्षण मुख्याध्यापक कक्ष केंद्र मुरुमगाव येथे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये २५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. दुपारचा सत्र आटोपल्यानंतर नवभारत साक्षरता कार्यक्रम हे अशैक्षणिक कार्य असल्याने त्यावर आमच्या शिक्षकांचा बहिष्कार आहे. त्यामुळे केंद्र मुरुमगाव येथे आयोजित १६ ऑक्टोबर ला दुपारचे सत्र आणि १७ ऑक्टोबरचे पूर्ण सत्र यावर बहिष्कार टाकत असल्याचे निवेदन केंद्रप्रमुख यांना देण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक बी.जी.भैसारे, एस.डब्ल्यू.गेडाम, एन.एम मुल्लेवार, पी.डी पेंदाम, आर.एम जेंगठे, एन. के. अत्राम, बी. जे.मेश्राम, व्ही. बी नंदनवार, व्ही.एस.मडावी, ए.एल.जनबंधू, एन. एम.तागडे आणि इतर प्रशिक्षणार्थी शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here