१९ ऑक्टोबरला ‘सर्च’ रुग्णालयात कर्करुग्णांची आरोग्य तपासणी

156

The गडविश्व
गडचिरोली, १७ ऑक्टोबर : गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन कर्करोगावर उपचार घेणे महागडे ठरते. गरीब व गरजूंवर जवळच्या भागात रोगाचे निदान व उपचार करता यावे, याकरिता चातगाव येथील सर्च रुग्णालयात कॅन्सरची ओपीडी सुरू करण्यात आली आहे.
गुरुवार १९ ऑक्टोबरला २०२३ ला कर्करोग ओपीडी आयोजित केली आहे, नागपुरचे तज्ञ डॉ.सुशील मांनधनिया हे दर महिन्याच्या तिसर्‍या गुरुवारी कर्करुग्णांची तपासणी करतील.
स्तनांचा रंग बदलणे, स्तन लटकणे, गाठ येणे किंवा आकार बदलणे ही सर्व स्तंनाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. त्याचप्रमाणे श्वास लागणे अशक्तपणा आणि थकवा जाणवणे, स्नायू आणि हाडे दुखणे ही सर्व फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. ही लक्षणे असणार्‍यांनी ओपीडीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन चातगाव येथील सर्च रुग्णालयाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here