– पिकअप वाहनात होते 48 भरलेले आणि 12 रिकामे सिलेंडर
The गडविश्व
सुकमा : छत्तीसगडच्या सुकमाच्या मामा कोंटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल सोमवारी नक्षल्यांनी एलपीजी (घरगुती गॅस) सिलेंडरने भरलेले पिकअप वाहन पळवल्याची घटना घडली आहे. यावेळी नक्षल्यांनी ड्रायव्हर आणि हेल्परला मारहाण करून तेथून पळवून लावले. यानंतर सिलेंडरने भरलेली पिकअप घेऊन नक्षली पळून गेले.
प्राप्त माहितीनुसार, चालक रवी आणि हेल्पर अजय कोंटा हे भेज्जी कॅम्पमध्ये जवानांना गॅस सिलिंडर वितरणासाठी जात होते दरम्यान नक्षल्यांनी पिकअप वाहनाला घेराव घातला व वाहन थांबवून चालक व हेल्परला खाली उतरवून मारहाण करत पुन्हा जवानांना सिलिंडरचा पुरवठा करणार नाही, अशी धमकी देत पळवून लावले. व नक्षल्यांनि पिकअप वाहन पळवले. पिकअपमध्ये 48 भरलेले आणि 12 रिकामे सिलिंडर होते.
सुकमाचे एसपी सुनील शर्मा यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. तसेच या सदर वाहनाचा शोध घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. वाहनाच्या शोधात पथक पाठवण्यात आले असून लवकरच वाहन सापडेल असेही त्यांनी संगीतले.