गडचिरोली : विद्युत विभागातील उप-कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात

570

– लाच स्विकारल्या प्रकरणी कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, १७ ऑक्टोबर : तक्रारदारास त्याच्या घरगुती मीटरमध्ये फॉल्टी असल्याचे कारण सांगून दंडाची रक्कम कमी करून देण्याचा मोबदला म्हणून ४० हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून पहिला टप्पा २० हजार रूपयांची लाच रक्कम स्विकारतांना रंगेहाथ मिळून आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गडचिरोली पथकाने विद्युत विभागातील उपकार्यकारी अभियंतावर करावाई केली आहे. विनोदकुमार नामदेवराव भोयर (४७), उप कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कं.मर्या आलापल्ली असे लाखखोर अभियंताचे नाव आहे. सदर करवाईन विद्युत विभागात एकचं खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार यांना त्यांचे घरगुती मीटर फॉल्टी असल्याचे कारण सांगुन आलापल्लीचे उप कार्यकारी अभियंता भोयर यांनी अंदोज २ लाख २० हजार रूपये दंड भरावे लागेल असे बोलुन सदर दंडाची रक्कम कमी करून ७३ हजार ६९८ रूपयांचा दंड केला व सदर दंडाची रक्कम कमी केल्याचा मोबदला म्हणून भोयर यांनी तक्रारदारास ४० हजार रूपयांच्या लाच रकमेची मागणी केली. मात्र तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची कोणतीही इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले यांचे पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक शिवाजी राठोड यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनियरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले असता पडताळणी दरम्यान भोयर यांनी दंड कमी करून देण्याचा मोबदला म्हणून ४० हजार रूपयांच्या लाच रकमेची मागणी पंचसाक्षीदारासमक्ष सुस्पष्ट मगणी केली व पहिला टप्पा म्हणून २० हजार रूपये स्विकारतांना रंगेहाथ मिळून आले.
याप्रकरणी उपकार्यकारी अभियंता भोयर विरूध्द पोलीस स्टेशन अहेरी येथे गन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असून वरोरा जि. चंद्रपूर येथील त्यांच्या निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूरतर्फे झडती घेण्यात येत आहे.
सदर कार्यवाही नागपूर लाप्रवि पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर, नागपूर अपर पोलीस अधिक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोनि शिवाजी राठोड, सफौ सुनिल पेद्दीवार, पोहवा नथ्थु धोटे, रोजेश पदमगिरवार, पोशि किशोर ठाकुर, संदिप उडाण सर्व लाप्रवि गडचिरोली व चापोना विक्रमजीत सरकार, मोपवि गडचिरोली यांनी केली.

(The Gdv, The Gadvishva, Gadchiroli News, ACB Trap, Crime News)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here