स्वतः मधील ‘अँग्री यंग मॅन’ ला शोधा : संपादक श्रीपाद अपराजित

118

– गोंडवाना विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाला भेट
The गडविश्व
गडचिरोली, २० ऑक्टोबर : स्वतःमधील ‘अँग्री यंग मॅन’ ला शोधा, मातीशी जुळून पत्रकारिता करा आणि अंतिम ध्येयापर्यंत पोहचा असे प्रतिपादन महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्राचे संपादक श्रीपाद अपराजित यांनी जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना केले. ते गोंडवाना विद्यापीठ येथील जनसंवाद विभागाला मार्गदर्शन करतांना बोलत होते. आज शुक्रवार २० ऑक्टोबर ला महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्राचे संपादक श्रीपाद अपराजित आणि दैनिक सकाळ वृत्तपत्राचे वरिष्ठ पत्रकार केवल जीवनतारे यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाला भेट दिली. दरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी केवल जीवनतारे यांनी आपला पत्रकारिता मधील प्रवास सांगत स्वतःला कमी लेखू नका, विपरीत परिस्थिती वर मात करत पुढे जा, असा सल्ला दिला. यावेळी जनसंवाद विभागाच्या समन्वयक डॉ. रजनी वाढई यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जनसंवाद विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. संजय डाफ, डॉ. सरफराज अन्सारी, डॉ. चैतन्य शिनखेडे, प्रा. रोहित कांबळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here