The गडविश्व
सांगली, २१ ऑक्टोबर : व्हॉईस ऑफ मीडिया सांगली जिल्हा शाखेच्या वतीने पत्रकार, पाल्य आणि विद्यार्थ्यांसाठी रविवार, २२ ऑक्टोबर रोजी सांगली येथे डिजिटल कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत डिजिटल आणि सोशल मीडिया, गूगल सेवांचा वापर आणि फायदे, डिजिटल पत्रकारितेतून कमाईची साधने, युट्युब पत्रकारिता आणि बारकावे, ब्लॉग लेखनाच्या सोप्या पध्दती, एआयचा पत्रकारितेमध्ये वापर कसा करावा? आणि कौशल्यपूर्ण कामातून घरबसल्या कमाई या विषयांवर मार्गदर्शन केले जाईल.
ही कार्यशाळा सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत प्रयास अकॅडमी, धनंजय हाऊसिंग सोसायटी, सिव्हिल हॉस्पिटलच्या दक्षिणेस सांगली येथे होणार आहे. या कार्यशाळेचे प्रशिक्षण देवनाथ गंडाटे यांच्याकडून दिले जाणार आहे. गंडाटे हे पत्रकार, ब्लॉगर, वेब डिझायनर आणि डिजिटल मीडिया अभ्यासक आहेत.
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी https://forms.gle/mDpc7X2fg9TUcMpp8 या लिंकवर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. अधिक माहितीसाठी Sachin Mohite यांच्याशी मोबाईल नंबर +91 95525 15784 संपर्क साधावा.
या कार्यशाळेमुळे पत्रकार, पाल्य आणि विद्यार्थ्यांना डिजिटल जगातील नवीन संधी आणि तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळेल. या कार्यशाळेमुळे त्यांचा डिजिटल कौशल्य विकास होण्यास मदत होईल.