The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, (चेतन गहाने) २२ ऑक्टोंबर : तालुक्यातील ग्रामपंचायत गेवर्धा अंतर्गत तलाठी साजा गेवर्धा मध्ये वसंता चन्ने, संदीप दरो, अनिल दरो रा.गेवर्धा आणि जनार्धन शेंडे, केशव कन्नमवार, मंगेश हुपेंडी रा.गुरनोली या शेतकऱ्यांची शेती असून अनेक वर्षापासून मोकळ्या जागेतून शेतीमध्ये आवागमन सुरु होते. परंतु मागील २ वर्षांपूर्वी या शेतकऱ्यांच्या समोरील शेतजमीन फैझान शेख रा.कुरखेडा यांनी खरेदी केली होती. तेव्हापासून शेतीच्या रस्त्याबद्दल शेतकऱ्यामध्ये वाद निर्माण झाला होता. वसंता चन्ने व इतर शेतकऱ्यांनी शेतीला रस्ता मिळावा यासाठी तहसील कार्यालय कुरखेडा येथे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे नायब तहसीलदार यांनी घटनास्थळावर भेट घेतली पण तक्रारकर्त्या शेतकरी बांधवाच्या बाजूने कोणताही निर्णय दिला नाही. त्यामुळे संबंधित शेतकरी यांनी महात्मा गांधी तंटामुक्त समिती गेवर्धा यांचेकडे अर्ज सादर केला.
सदर अर्जानुसार आज रविवार २२ ऑक्टोबर ला तंटामुक्त समिती पदाधिकारी यांनी घटनास्थळावर भेट देऊन वादी आणि प्रतीवादी यांची समजुत घालून प्रत्यक्ष रस्ता मोजून देण्यात आले आणि अर्जदार शेतकरी यांनी तातडीने रस्ता तयार करून आपली आवागमन सुरु करण्यात यावी अश्या सूचना देण्यात आले. तंटामुक्त समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा रस्त्याच्या मार्ग निकाली निघाल्याने शेतकरी बांधवानी तंटामुक्त समितीचे आभार मानले.
याप्रसंगी तंटामुक्त समिती अध्यक्ष राजु बारई, उपसरपंच ओमप्रकाश बोगा, ग्रा.पं. सदस्य रोशन सय्यद, आशिष टेम्भूर्णे, पो.पा.भाग्यरेखा वझाडे, तलाठी कुंभारे, तंटामुक्ती सदस्य राजेंद्र कुमरे, योगेश नखाते, योगेश गायकवाड, स्वप्नील नागापुरे, टंटा मुक्ति सदस्य ताहीर शेख, विनायक कुथे, ग्रामसभा अध्यक्ष सुरेश पुसाम, रामदास कुमरे, कृष्णा मस्के, कोतवाल गायत्री कुमरे, बबन राऊत, संदीप राऊत, जगदेव शेंडे आदी उपस्थित होते.