The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाने) २३ ऑक्टोबर : स्थानिक पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेला अतिदूर्गम व जगंलाने वेढलेल्या चव्हेला येथे सूरू असलेल्या अवैध मोहफूलाचा हातभट्टीवर पोलीसानी आज सोमवार २३ ऑक्टोबर रोजी धडक देत ८ ड्रम मोहसडवा व १०० लिटर अवैध मोहफूलाची दारू जप्त करीत एका आरोपी विरोधात गून्हा दाखल केला.
अवैध मोहफूलाची दारू पूरवठ्याकरीता चव्हेला हा गाव कुप्रसिद्ध आहे येथूनच मोठ्या प्रमाणात कुरखेडा व आरमोरी तालूक्यात दारूचा पूरवठा होत असतो. हा गाव घनदाट जगंलाने वेढलेला व संवेदनशील असल्याने येथे पोहचण्याकरीता व्यवस्थीत रस्ता सूद्धा नाही. नेमक्या याच परिस्थितीचा गैरफायदा घेत येथील काही इसमांनी येथे अवैध हातभट्टया स्थापलेल्या आहेत. ही अवैध दारू पुरवठ्याची साखळी तोडण्याकरीता कुरखेडा पोलीसानी आज थेट दूर्गम चव्हेला येथेच धडक दिली व जगंलाच्या आश्रयाने सूरू असलेली अवैध मोहफूलाची दारू भट्टी उध्वस्त केली. यावेळी ८ ड्रम मोहसडवा व १०० लिटर गाळलेली दारू एकूण किंमत ६० हजार जप्त करण्यात आली व आरोपी जिवन सोमाजी कुर्चामी (४२) रा. चव्हेला याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(फ) ६५(ई) अन्वये गून्हा दाखल करण्यात आला. सदर कार्यवाही ठाणेदार संदीप पाटील यांचा नेतृत्वात पोलीस हवालदार शेखर मडावी, भाश्कर कीरंगे, विनोद दूगा, संदेश भैसारे,प्रदिप भसारकर, क्रिष्णा ठाकरे, महिला पोलीस शिपाई अश्विनी रामटेके यांचा चमूने केली.