गडचिरोली : विद्युत शिकार सापळ्यात वाघ अडकला, शिकाऱ्यांनी पंजे केले गायब

1699

– वनविभागात खळबळून झाले जागे
The गडविश्व
गडचिरोली, २४ ऑक्टोबर : विद्युत प्रवाहाचा वापर करून डुकराची शिकार करण्यासाठी लावलेल्या सापळयात चक्क वाघच अडकल्याने त्याचा मृत्यू झाला तर शिकारी एवढयावरच न थांबता चक्क वाघाचे पंजे आणि डोक्याचा काही भाग गायब केल्याचे निर्दर्शनास आल्याची घटना आज मंगळवार २४ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. सदर घटनेने वन विभागात एकचं खळबळ उडाली असुन ही घटना गडचिरोली वन विभागांतर्गत येत असलेल्या चातगाव वन क्षेत्रातील अमिर्झा बिटात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चातगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या अमिर्झा बिटात आज सकाळच्या सुमारास गुराखी गुरे चारण्याकरीता गेले असता वाघ मृतावस्थेत आढळून आला. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली असता वनाधिकारी घटनास्थळी दाखल होत पंचनाम्याची कारवाई केली. दरम्यान डुकराच्या शिकारीसाठी विद्युत प्रवाहाचा सापळा रचण्यात आला होता त्यात वाघ अडकल्याचे समजते. शिकाऱ्यांनी अक्षरः वाघाचे पंचे आणि डोक्याचा काही भाग गायब केल्याचे कळते.
चातगाव जंगल परिसरात वाघाचा वावर आहे. अनेकदा नागरिकांना वाघ निदर्शनास आला आहे. मागील काही माहिन्यांपूर्वीही वाघाची शिकार करण्याचे प्रकरण उघडकीस आले होते. आता पुन्हा वाघाची शिकार झाल्याचे प्रकरण समोर आल्याने या परिसरात पुन्हा शिकारी सक्रीय असल्याचे दिसून येत असुन काल २३ ऑक्टोबर ला आरमोरी पासुन काही अंतरावर नरभक्षक वाघीनीला जेरबंद करण्यात आले तर आज गडचिरोली पासुन काही अंतरावर असलेल्या जंगल परिसरात वाघाची शिकार झाल्याचे उघकीस आल्याने मात्र या शिकार प्रकरणाने वन विभाग खळबळुन जागे झाले आहे. अज्ञात शिकारीचा शोध घेणे सुरू असल्याचे कळते.
(The Gadvishva, The Gdv, Gadchiroli News Updates, Gadchiroli Forest, Chatgao Forest, Amirza)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here