– रामपुर वासियांनी केले श्रमदान
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २६ ऑक्टोबर : धानोरा ते मुरुमगाव राष्ट्रीय महामार्ग नव्याने खाजगी कंत्राटदाराने बांधले पण यावर्षी पडलेल्या मुसळधार पावसाने रस्त्याची वाट लावली. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यात अपघात होवून जिव गमवावा लागला. परंतु संबंधित विभागाचे होणारे दुर्लक्ष बघताच धानोरा तालुक्यातील रामपुर येथील गावकऱ्यांनी श्रमदानातून या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविल्याने येथिल खड्ड्यात होणारे अपघात तात्पुरते टाळता येईल.
धानोरा तालुक्यातील मुरुमगाव वरून पाच किमी अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील रामपूर गावालगत मागिल एक वर्षांपासून मोठे मोठे जिवघेणे खड्डे निर्माण झाले होते. त्यामुळे अपघात होत होते. मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या अपघाताकडे शासन व प्रशासना कडून दूर्लक्ष होत असल्याने रामपूर गावातील संपूर्ण नागरिकांनी श्रमदानातून NH930 मुख्य महामार्गावरील मोठ मोठे खड्डे बुजविल्याने वाहनधारकांनी आभार मानले. या संपूर्ण महामार्गावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. अवघ्या सहा महिन्यांत रस्ताच्या बांधकामांचे तिनतेरा वाढल्याचे दिसून येते.