एससी,एसटी, ओबीसी व मायनोरिटी यांना न्याय देण्यासाठी नेतृत्व विकास अभियानाच्या बळकट करा : माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी

149

The गडविश्व
गडचिरोली, दि. ३१ : सध्या देशामध्ये लोकशाही आणि संविधान संकटात आहे. म्हणून सर्व ‘एससी, एसटी, ओबीसी व मायनोरिटी’ यांना संविधान व लोकशाही मुळे स्वरक्षण मिळालेलं आहे. या सगळयांनी मिळून आरएसएस व भाजपचं कुटील डाव हाणून पाडण्यासाठी एकत्र काम करून प्रत्येक मतदार संघात काँग्रेस पक्ष नेतृत्व विकास अभियानाच्या (LDM )च्या माध्यमातून बळकट करावा असे प्रतिपादन माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले. ते महाराष्ट्र काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे ३० ऑक्टोबर रोजी नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा (LDM) पार पडली यावेळी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गरिबी ही जात म्हणत असले तरी गरिबी ही नाही तर देशाला लागलेला कलंक आहे. तो पुसण्याची व गरिबांना सामाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. परंतु भाजपाची मनुवादी प्रवृत्ती गरिब, मागास समाजाचा विकास होऊ देत नाही, आदिवासी विरोधी भूमिका नेहमीच राहिली आहे. जनतेला खरी परिस्थिती समजली पाहिजे त्यासाठी नेतृत्व विकास अभियानाच्या माध्यमातून जनतेसोमर वास्तविकता मांडा. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात काँग्रेस पक्ष विजयी घौडदौड करत आहे. महाराष्ट्रातून जास्तीत जात खासदार निवडून देऊन राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचा आमचा संकल्प आहे. काँग्रेसचा विचार तळागाळात पोहचवणे व काँग्रेस पक्षाला विजयी करण्यासाठी काम करण्याचे आवाहन यावेळी डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले.
या नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक विभागाचे समन्वयक के. राजू, एससी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोठीया, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, आमदार प्रणिती शिंदे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, एसी. सी. विभागाचे प्रमुख हत्ती अंबिरे, प्रदेश उपाध्यक्ष भाई नगराळे, LDM राष्ट्रीय समन्वयक क्षितीज अढ्याळ, LDM प्रदेश समन्वयक व प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार, OBC राज्य समन्वय धनराज राठोड ,लताताई पेंदापल्ली, पंकज खोबे LDM चे लोकसभा, विधानसभा समन्वयक आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here