रांगी परिसरात जंगली हत्तीचा धुमाकूळ ; भात पिकाचे नुकसान

1134

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.५ : धानोरा तालुक्यातील रांगी परिसरात ३ नोव्हेंबर च्या रात्री जंगल परिसरात जंगली हत्तीने सध्या चांगलाच धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांच्या धान पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याने वनविभागाने वेळीच आवर घालुन शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वानरचुवा, वनखेडा, नरचुली परिसरात हत्ती ने धुमाकूळ घातल्यानंतर हत्तीच्या कळपाने आपला मोर्चा रांगी गावाकडे वळविला. रांगी येथिल शांताराम बर्डे, सोमीना मेश्राम, अहमद खा पठाण, प्रेमिका मेश्राम यांच्या शेतातील कापनीला आलेले उभे भातपीक जंगली हत्तीच्या कळपाने जमिनदोस्त केले. शेतकऱ्याच्या तोंडातील घास हत्तीने पळविल्या ने बळीराजा संकटात सापडला आहे. शांताराम बर्डे यांच्या शेतात मोटारपंप ला लावलेले पाईप फोडले, इलेक्ट्रिक डिपी तोडतात केले. लोकांमधे दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने वेळीच बंदोबस्त करावा. अशी मागणी नागरिकासह शेतकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here