The गडविश्व
गडचिरोली, दि. ७ : जिल्ह्यातील मुलचेरा आणि कोरची तालुक्यात सात दिवसीय तितली (Titali) संघरक्षिणी प्रशिक्षण यशस्वीपणे पार पडले. सदर प्रशिक्षण २९ ऑक्टोबर दरम्यान मुलचेरा आणि ३१ ऑक्टोबरला कोरची तालुक्यात सुरु करण्यात आले होते. ‘तितली’ हि संस्था पूर्व प्रार्थमिक शिक्षण मध्ये प्रगती आणण्यासाठी काम करते. या प्रकल्पाचे मूळ उद्देश अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ३-६ वर्षे वयोगटातील मुलांना औपचारिक शालेय शिक्षणासाठी तयार करण्यासाठी सक्षम बनविण्याचा प्रयत्न करणे असे आहे.
या प्रशिक्षणात मुलचेरा आणि कोरची या तहसीलच्या एकूण ४ महिला पर्यवेक्षक, ३० अंगणवाडी सेविका आणि ३० मदतनीस यांनी उपस्थिती दर्शवून प्रशिक्षण गाजवले. विशेष म्हणजे, भारत सरकारचा उपक्रम, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड (NPCIL) चे एक युनिट, तारापूर अणुऊर्जा केंद्र (TAPS) च्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमाद्वारे हा उपक्रम शक्य होत आहे.
या प्रकल्पाला गडचिरोलीचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी संजय मीना आणि गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंग यांचे मौल्यवान समर्थन मिळाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडण्यास श्रीमती अर्चना इंगोले DSWO गडचिरोली, यु. येन. गुरनुले विस्तार अधिकारी गडचिरोली, आर. फाये BDO कोरची, गणेश कुकडे सीडीपीओ कोरची, श्रीमती अमरी बिस्वजित रॉय सीडीपीओ मुलचेरा, रणजीत तालुकदार विस्तार अधिकारी मुलचेरा, अक्षय दोनाडकर विस्तार अधिकारी कोरची यांचे समर्थन आहे. तितली टीमचे कु. मयुरीका त्रिपाठी, कु. निशी शहा, मुकेश नागापुरे आणि श्री धर्मेद्र आडभैया यांनी आपल्या कौशल्याने हे प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडले.

(Titali, gadchiroli, The Gadvishva, The Gdv, Gachiroli News Updates )