जिल्हयातील आरोग्य सेवा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्नशील : सीईओ आयुषी सिंह

204

The गडविश्व
गडचिरोली, दि.०७ : जिल्हयात एन.एच.एम.अतंर्गत कंत्राटी अधिकारी / कर्मचारी बेमुदत संपावर गेल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी सर्व तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी तसेच वैद्यकीय यांची व्हि.सी.द्वारे सभा घेऊन कार्यरत अधिकारी तसेच कर्मचारी वर्गामार्फत पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जिल्हयातील आरोग्य सेवा कोलमडणार नाही, नागरीक आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही, या अनुषंगाने पर्यायी व्यवस्था करून नियमित आरोग्य सेवा पुरविण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिले आहे.
जिल्हयामध्ये ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३४ आरोग्य पथक, ऑलोपेथीक दवाखाना ५ व आरोग्य उपकेन्द्र  ३७६ आहे. जिल्हयातील फक्त एन.एच.एम. अतंर्गत कंत्राटी अधिकारी/ कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. प्राथमिक आरोग्य केन्द्र , आरोग्य पथक, ऑलोपेथीक दवाखाना व आरोग्य उपकेन्द्र अतंर्गत नियमित अधिकारी वर्ग तसेच आरोग्य कर्मचारी संपात सहभागी नाहीत. कंत्राटी अधिकारी/ कर्मचारी वर्ग संपावर असले तरी जिल्हयामध्ये सर्व प्राथमिक आरोग्य केन्द्र कार्यान्वित असून आरोग्य सेवा नियमित व सुरळीत चालु आहे, असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here