गडचिरोली : वनरक्षक व वनमजुर अडकले एसीबीच्या जाळ्यात

288

– २२ हजारांची स्विकारली लाच

The गडविश्व
गडचिरोली : वडिलोपर्जीत अतिक्रमीत जागेवर बांध टाकून ती शेतीयोग्य करण्याच्या कामाकरिता शेतकऱ्याकडून 30 हजार रूपयांच्या लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती 22 हजार रूपयांची लाच रक्कम स्विकारल्याने धानोरा तालुक्यातील रांगी बिटाचा वनरक्षक रणजित प्रभुलाल कुडावले (50) व वनमजूर देवराव रामचंद्र भोयर (52) यांना लाप्रवि पथकाने रंगेहाथ पकडल्याची कारवाई काल 1 फेब्रुवारी रोजी करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारकर्ता हे शेतकरी आहेत. त्यांनाा वडिलोपर्जीत अतिक्रमीत जागेवर पारे टाकून शेती करायची होती. याकरिता शेतकऱ्याने रांगी येथील वनविभागाकडे रितसर अर्ज केला. परंतु वनरक्षक रणजित कुडावले यांनी सदर काम करून घेण्यासाठी ३० हजार रुपये लाच रकमेची मागणी केली. सदर लाच रक्कम देण्याची शेतकऱ्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाप्रवि गडचिरोली येथे तक्रार दाखल केली. दाखल केलेल्या तक्रारीची लाप्रवि अधिकाऱ्यांने गोपनियरित्या चौकशी केरून सापळा कारवाईचे आयोजन केले. दरम्यान काल १ फेब्रुवारी रोजी रांगी-जांभळी मार्गावर तक्रारकर्ता शेतकऱ्याकडून वनमजूर देवराव भोयर याच्यामार्फतीने तडजोडीअंती २२ हजारांची लाच रक्कम स्विकारल्याने लाप्रवि पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी वनरक्षक वनरक्षक रणजित प्रभुलाल कुडावले (५०) व वनमजूर देवराव रामचंद्र भोयर (५२) यांच्याविरूध्द पोलीस स्टेशन धानोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई, गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक सुरेंद्र गरड, पोलीस निरीक्षक यशवंत राऊत, सहायक फौजदार प्रमोद ढोरे, नथ्थू धोटे, शिपाई किशोर जौंजाळकर, श्रीनिवास संगोजी, राजू पद्यगिरवार, स्वप्नील बांबोळे, किशोर ठाकूर, संदीप घोरमोडे, संदीप उडाण, विद्या म्हशाखेत्री, ज्योत्नाघर वसाके, तुळशीराम नवघरे, आदींनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here