– मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानतर घडली घटना
The गडविश्व
गडचिरोली, दि.१६ : जिल्हयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळी साजरी केल्यानंतर नक्षल्यांनी पुन्हा डोके वर काढत तरूणाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने पुन्हा एकदा नक्षली सक्रीय असल्याचे दिसुन येत आहे. दिनेश पूसु गावडे (२७) रा. लाहेरी ता.भामरागड असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नक्षल्यांनी दिनेश गावडे ची पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयातुनन हत्या केली असल्याचे नक्षल्यांनी मृतदेहावर ठेवलेल्या पत्रकातुन सांगितले. काल १५ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिदे गडचिरोली जिल्हयातील एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी येथे पोलीसांशी दिवाळी साजरी करण्याकरिता आले होते. मुख्यमंत्री जात नाहीत तोच भामरागड तालुक्यात तरूणाची नक्षल्यांनी रात्रौच्या सुमारास हत्या केल्याची घटना घडली. सदर घटनेने परिसरात दहशत पसरली असुन नक्षली सक्रिय असल्याचे दिसुन येत आहे. दिनेश ची पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयातुन नक्षल्यांनी हत्या केली असली तरी पोलीसांनी मात्र तो पोलीस खबऱ्या नसल्याचे सांगितले आहे. दिनेशच्या चेहऱ्यावर धारदार शस्त्राचे वार असल्याचे कळते तर नक्षल्यानी हत्येनंतर मृतदेहावर पत्रक ठेवल्याचे आढळले आहे.
(The Gadvishva,The GDV, Gadchiroli News, Naxal, Police, Bhamragad, Etapalli)