The गडविश्व
गडचिरोली, दि.२२ : जिल्ह्यात एकमेव असलेल्या देसाईगंज रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळच रेल्वे रुळावर विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवार २२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. जान्हवी राजू मेश्राम (वय १७) रा. भगतसिंग वॉर्ड, देसाईगंज (वडसा) ता. देसाईगंज जि.गडचिरोली असे मृतक मुलीचे नाव आहे. रेल्वे रुळावर तिचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. या घटनेने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक ही अकरावी विज्ञान शाखेत शहरातील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. दरम्यान आज बुधवारी ती शिकवणी वर्गाला सकाळच्या सुमारास गेली होती असे कळते. सकाळी वडसा येथून बल्लारशाहकडे जाणाऱ्या ०८८०२ क्रमकाची गाडी ४३ मिनिटे उशिराने वडसा स्थानकात पोहचल्यानंतर वडसाहून बल्लारशाहला निघालेल्या स्थानकापासून १०० मीटर अंतरावर जान्हवीने रेल्वेसमोर येऊन आत्महत्या केल्याचे बोलल्या जात आहे. यावेळी तिचा शरीर छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती नागरिकांना होताच घटनास्थळी झुंबड उडाली होती. रेल्वे पोलिस व देसाईगंज पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मात्र हा अपघात होता की आत्महत्या हे मात्र अद्याप कळू शकले नाही.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news, desaiganj, relway)