गडचिरोली जिल्ह्यात आज आढळले २६४ नवे बाधित तर १८१ कोरोनामुक्त

174

– एका उच्च रक्तदाबग्रस्त व्यक्तीचा कोविडने मृत्यू
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयात आज 1086 कोरोना तपासण्यांपैकी 264 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 181 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 35122 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 33134 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1228 झाली आहे. आज नविन मृत्यूमध्ये गडचिरोली तालुक्यातील 65 वर्षीय पुरुषाचा (उच्च रक्तदाबग्रस्त ) समावेश आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 760 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.34 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.50 टक्के तर मृत्यू दर 2.16 टक्के झाला आहे.
आज 264 नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 59,अहेरी तालुक्यातील 37, भामरागड तालुक्यातील 07,आरमोरी तालुक्यातील 06, चामोर्शी तालुक्यातील 79, धानोरा तालुक्यातील 05, एटापल्ली तालुक्यातील 23, मुलचेरा तालुक्यातील 04, सिरोंचा तालुक्यातील 10, कोरची तालुक्यातील 26,कुरखेडा तालुक्यातील 06,आणि वडसा तालुक्यातील 02 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 181 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 98,अहेरी तालुक्यातील 08,आरमोरी तालुक्यातील 02,भामरागड तालुक्यातील 01,चामोर्शी तालुक्यातील 44,एटापल्ली तालुक्यातील 01,चामोर्शी तालुक्यातील 02, धानोरा तालुक्यातील 07, मुलचेरा तालुक्यातील 19,कोरची तालुक्यातील 01,कुरखेडा तालुक्यातील 07,आणि वडसा तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here