शासकीय योजनांचा लाभ तळागळातील लोकांपर्यंत पोहचवा : परमेश्वर गावळे

201

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.२८ : तालुक्यातील दुर्गापूर परिसरातील नागरिकांना कागदपत्राअभावी अनेक योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहलेल्या नाहीत. काही योजनांची माहिती नाही मात्र याची माहिती घेऊन सरकारच्या सर्व योजनांचा लाभ डोंगराळ, अतिदुर्गम भागातील लोकांनी घ्यावे व प्रशासनाने योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन परमेश्वर गावळे नवनियुक्त सरपंच ग्रामपंचायत दुर्गापूर यांनी केले आहे. ते विकसित संकल्प विकास कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना केले.
तालुक्यातील ग्रामपंचायत दुर्गापुर अंतर्गत विकसित संकल्प विकास यात्रा कार्यक्रम दुर्गापूर येथे २६ नोव्हेंबर रोजी पार पडली. यावेळी उद्घाटक म्हणून सखाराम हिचामी तालुका आरोग्य अधिकारी धानोरा तर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर ग्रामपंचायत सदस्य, मनोज मयाराम टेकाम, कु. यशोदा परदु टेकाम, श्रीमती विद्या रुपेश टेकाम, श्रीमतीरंजना उत्तम नरोटे, श्री नितीन वासुदेव मडावी, श्री बालसिंग मिरे गावडे, कु. सिंधू बालसिंग पोटावी, चहारे मंडळ अधिकारी पेढरी, कु. एम. बी. डोहे. सचिव ग्रामपंचायत दुर्गापुर, अविनाश किरंगे कृषी सहायक दुर्गापूर, संदीप काटेंगे तलाठी दुर्गापुर, उपस्थित होते.
आरोग्य विभाग, कृषी विभाग, महसूल विभाग, पशुसंवर्धन विभाग, उमेद /बचत गट महिला, अंगणवाडी, या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहुन शासनाच्या सर्व योजनेची माहिती देण्यात आली. पुढे म्हणाले जे शासनाच्या वतीने योजना राबवल्या जातात पण ग्रामीण भागात बरोबर योजनाच्या लाभ लोकांना मिळाले नाही. काही महिला, पुरुष, वयोमर्यादा ओलांडून निराधार योजने पासून वंचित आहेत, राशन कार्ड लोकांकडे नसल्याने शासनाने मोफत राशनचे धान्य मिळत नाही. शेतकऱ्यांकडे जातीचे प्रमाणपत्र नसल्याने शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. यावेळी सर्व शिक्षक वृंद गावातील नागरिक महिला व विद्यार्थी सहभागी झालेत. कार्यक्रमाचे संचालन कु. एम. बी. डोहे. सचिव ग्रामपंचायत दुर्गापुर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here