The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाने), दि. २८ : स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे आज मंगळवारला थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी निमित्य श्रद्धांजली देत अभिवादन करण्यात असले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार हे होते .
याप्रसंगी सर्वप्रथम थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले . डॉ.अविनाश गौरकार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले कि, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांना मुक्तपणे जगता यावे यासाठी परंपरावादी विचारांनी समाजात सुधारणा घडवून आणण्यात विशेष योगदान दिलेले आहे . प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असतात. कार्यक्रमाला शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील जेष्ठ शिक्षिका संघमित्रा कांबळे , उद्धव वाघाडे , प्रकाश मुंगनकर , नरेंद्र कोहाडे , राजेश पराते , लीकेश कोडापे , नोगेश गेडाम , सोनिका वैद्य , अनिल बांबोळे , कलिदास मलोडे व महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थिती होते .