– सरपंच परमेश्वर गावंळे यांची तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना मागणी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.२९ : तालुका अतिदुर्गम असुन अबाधित व निरक्षर असलेल्या शेतकऱ्यांनी ई-पिक पाहनीची व धान खरेदी ऑनलाईनची मुदत वाढवून देण्याची मागणी परमेश्वर गावंळे सरपंच ग्रामपंचायत दुर्गापुर, देवसाय गावळे उपसरपंच कामतळा यांनी तहसिलदार धानोरा यांच्या मार्फत जिल्हाधिकारी गडचिरोली यांना २९ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी पूर्ण झालेली नाही. शासनाचे विकसित भारत संकल्प यात्रा गावागावात कार्यक्रम सुरू असल्याने तलाठी व इतर कर्मचारी सदर कामात गुंतून असल्याने शेतकऱ्यांना सातबारा मिळणे कठीण झाले आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना धानविक्री करता ऑनलाईन करण्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने सात बारावरील ई- पिक पाहणीची व धान विक्रीची ऑनलाईन ३० डिसेंबर २०२३ पर्यंत मुदत वाढण्याची मागणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना ऑनलाईन करताना सातबारा वर असलेल्या सर्वांचे आधार कार्ड मागविण्यात येत आहे. घरातील सर्व व्यक्ती नोंद असताना एखाद्या व्यक्ती मयत झाल्यास त्याची नोंद केली नसल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू दाखला सादर करू शकत नाही. तरी आधार कार्ड मृत्यू दाखल्याची अट रद्द करण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्यांना कोणताही मानसिक व शारीरिक त्रास होणार नाही अशी मागणी करण्यात आली आहे.