निमगाव येथे काकड आरतीचा समारोप

245

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.०२ : श्री गुरुदेव सेवा सत्संग सेवा मंडळ निमगाव व समस्त निमगाव रांगी ग्रामवासीयांच्या संयोगाने काकड आरतीचा समारोप व राष्ट्रसंतांची पुष्प तिथी सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला.
निमगाव येथील हनुमान मंदिरात मागील अनेक वर्षापासून काकड आरती पहाटे 5 ते 6.30 या कालावधीत होत असते .या काकड आरतीचा पर्व कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी जयंती असा असतो.
या काकड आरतीला निमगांव येथिल मोंगरकर महाराज, केशव मेश्राम, पांडुरंग मेश्राम, लालाजी जाळे, मुरलीधर कुळमेथे, वासुदेव शेळमाके, यशवंत शेडमाके, दिलीप वासेकर पत्रु जुवारे, हेमराज चापले, बाबुराव होळी, प्रमोद बोबाटे, विश्वनाथ वरखडे, आनंदराव वरखडे, तुळशीदास कुकुळकर, चेतन सुरपाम, मनीराम वरखडे, अशोक वरखेडे, सहभागी होत असतात.
या काकड आरतीचा समारोप व राष्ट्रसंताच्या मुख्य तिथीचा योग जणू दुग्ध शर्करा योग 29 नोव्हेंबर 2023 सायंकाळी 6.00 वाजता घटस्थापना व सामूहिक प्रार्थनेने सुरू करून रात्री भजन कीर्तन व पहाटे 30 नोव्हेंबर ला ध्यान, ग्रामसफाई 9.30 वाजता ध्वजारोहण महाराजांच्या मूर्तीला पुष्प माला अर्पण व 4.00 वाजता गोपालकाला आणि सायंकाळी सामुदायिक सहभोजन करून सांगता करण्यात आली.
यावेळी जिजाबाई मेश्राम, शकुंतला मोंगरकर, शोभाबाई मेश्राम, यशोदाबाई वरखडे, बारूबाई कुमरे तसेच गावातील महिला मंडळी सह गावकरी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here