गडचिरोली : दोन लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षलीस अटक

1534

– विविध गुन्ह्यात होता सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, दि.०६ : विविध गुन्ह्यात सहभाग असलेल्या व शासनामार्फत दोन लाखांचे बक्षीस जाहीर असलेल्या जहाल नक्षलीस गडचिरोली पोलीस दलाने नक्षल विरोधी अभियान राबवित अटक केली आहे. महेंन्द्र किष्टय्या वेलादी (वय 32 ) रा. चेरपल्ली, तह. भोपालपट्टनम, जि. बीजापूर (छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या2 नक्षलीचे नाव आहे.
02 ते 08 डिसेंबर दरम्यान माओवादी हे पीएलजीए सप्ताह साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलीस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. यादरम्यान अटकेतील नक्षली उपपोस्टे दामरंचा जवळ असलेल्या इंद्रावती नदीजवळ पोलीस पार्टीच्या हालचालींबाबतची माहीती देण्याच्या उद्देशाने फिरत असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे विशेष अभियान पथकाचे जवान, सीआरपीएफ ९ बटालियन जी कंपणीचे जवान व उपपोस्टे दामरंचा पोलीस पार्टीच्या जवानांनी माओवाद विरोधी अभियान राबवून त्यास अटक केली. अधिक तपासात ₹ तो दामरंचा व मन्नेराजाराम या दोन्ही पोस्ट पार्टीच्या जवानांच्या नियमित कामकाजाच्या हालचालींवर पाळत ठेवून त्यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने अहेरी दलमच्या माओवाद्यांना माहिती पुरवीत होता अशी माहिती आहे. त्याचा 2023 च्या सुरवातीला झालेल्या कापेवंचा ते नैनेर जंगल परिसरात वन अधिका­यांवर दरोडा, हल्ला आणि जाळपोळ करण्याच्या घटनेमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता हे उघड झाले त्यानुसार त्यास उपपोस्टे राजाराम (खां) तह. अहेरी, जि. गडचिरोली येथे विविध कलमान्वये अटक करण्यात आलेली आहे.
तो सन 2009 मध्ये माओवाद्यांच्या सप्लाय टीमचा सदस्य म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि माओवादी चेरपल्ली जंगल परिसरात आल्यानंतर तो त्यांची सेंत्री ड्युटी करायचा. सन 2010 पासून नॅशनल पार्क, बीजापूरच्या सॅण्ड्रा भागात सीपीआय (एम.) चा चेरपल्ली आरपीसीचा (रक्षा पार्टी कमीटी) सदस्य, त्यानंतर तो नॅशनल पार्क एरिया, बीजापूर येथील सॅण्ड्रा दलममध्ये सदस्य म्हणून काम त्याने आपल्या कार्यकाळात डिसेंबर 2017 मध्ये सॅण्ड्रा जंगल परिसर, डिसेंबर 2022 मध्ये गडचिरोली आणि बीजापूर पोलीसांच्या संयुक्त पथकासोबत टेकामेट्टा जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये सहभाग. सन 2023 मध्ये कापेवंचा ते नैनेर जाणा­या रोड जंगल परिसरात वन विभागाच्या कर्मचा­यांना मारहाण व त्यांचे वाहन जाळपोळीच्या गुन्ह्रात सहभाग. मे 2023 रोजी सॅण्ड्रा गावातील एका निरपराध इसमाच्या हत्येमध्ये सहभाग होता.
महाराष्ट्र शासनाने महेंन्द्र किष्टय्या वेलादी याच्या अटकेवर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 72 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश सा. यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच मा. पोलीस अधीक्षक यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here