– निडर रेती तस्करांवर बसणार का चाप ?
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : जिल्हयातील देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा रेती घाटावरून अवैधरित्या रेतीची तस्करी केली जात होती. याबाबत अनेकदा वृत्त प्रकाशित करण्यात आले होते दरम्यान महसुल विभागाल जाग येत अखेर कोंढाळा रेतीघाट मार्गावर खड्डे खोदुन रेती तस्करांची वाट अडवीली आहे.
देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा रेतीघाटाच्या वैनगंगा नदीपात्रातुन अवैधरित्या रेतीची तस्करी केल्या जात होती. मात्र याकडे महसुल विभागाचा कानाडोळा होत होता. अनेकदा वृत्त प्रकाशित करून रेतीची होत असलेली लुट याकडे महुसुल विभागाचे लक्ष वेधण्यात आले. रात्रोच्या सुमासार निडर रेती तस्कर कोंढाळा रेती घाटातुन रेतीची तस्करी करीत होते. यापुर्वी महसुल विभागाने कारवाई करत रेतीघाट मार्गावर खड्डेे खादले होते मात्र निडर रेती तस्करांनी शक्कल लढवत चक्क ते खड्डे बुजवत रेती तस्करी करीता रस्ता तयार केला. निडर रेती तस्करांनी महसुल विभागाच्या डोळयात धुळ टाकत रात्रोच्या सुमारास रेतीची तस्करी करण्याचे काम सुरू केले मात्र याबाबत परिसरातील नागरिकांनी रेती तस्करी बाबत अनेकदा कळविले. अखेर महसुल विभागाला जाग येत आता पुन्हा रेतीघाट मार्गावर तब्बल २० फुट खोल खड्डे खोदुन रेती तस्करांची वाट अडवीली आहे. मात्र निडर रेती तस्कर पुन्हा काय नवी शक्कल लढवतील हे सुद्धा सांगता येत नाही. वैनगंगा नदीपात्रात चांगल्या प्रतीची रेती उपलब्ध असल्याने अवैध रेती तस्करांना हे नदीपात्र वरदानच ठरले आहे. मात्र आता महुसुल विभागाने रेतीघाट मार्गावर जाणाऱ्या मार्गावर खड्डे खोदले हे मात्र खरे परंतु निडर रेती तस्कारांना रोखण्यासाठी महसुल विभागाचे हे सुध्दा प्रयत्न निष्फळ ठरणार नाही असेही बोलल्या जात असुन रेती तस्करांवर ठोस कारवाई कधी असा सुध्दा सवाल करण्यात येत आहे.