The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि.१३ : तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा रामगड शाळेतील एकूण चार विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेकारीता निवड झाली आहे.
ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील कबड्डी स्पर्धेत १९ वयोगटातील अंकुश उदेसिंग वट्टी याची निवड झाली तर १७ वयोगटातील सलमान सियाराम मुलेटी याची खो – खो व हॅन्डबॉल करिता निवड झाली आहे. तसेच मुलींमधील १९ वयोगटातील सोनाली तुळशीराम धुर्वे हिची हॅन्डबॉल तर १४ वयोगटातील अंतरा दशरथ कवडो हिची हँडबाल करिता निवड झाली आहे. या सर्वांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्यध्यापक मा. के. एस. तुमसरे सर व क्रीडा शिक्षक मा. खंडाते सर यांना दिले आहे.
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आश्रम शाळा रामगड शाळेतील सर्व शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील स्पर्धेकारिता शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तुमसरे, दोनाडकर, वाळके मॅडम, खंडाते, चिडे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.