– गडचिरोली विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तम एम. मुधोळकर यांचा न्यायनिर्वाळा
The गडविश्व
गडचिरोली, दि.१५ : गाव तलावावर कपडे धुवायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बळजबरी करून अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीस गडचिरोली विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तम एम. मुधोळकर यांनी २५ वर्षे सश्रम कारावास व एक लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अनिल बाजीराव मडावी (वय ४८) असे आरोपीचे नाव आहे.
धानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ जानेवारी २०१८ रोजी सदर घटना घडली. आरोपीने पीडित मुलीवर अतिप्रसंग करून सदर प्रकाराबाबत घरी वाच्यता केली तर कापुन मारून टाकीन अशी धमकी दिली. पीडितेने घरी पोहचून सदर घडलेला प्रसंग आपल्या आईला संगीतिला असता घटणेची गांर्भीयता घेऊन पीडीतेच्या आईने पोस्टे धानोरा येथे तोंडी रिपोर्ट दीली. तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे धानोरा येथे २४ जानेवारी २०१८ ला कलम ३७६, ५०६ (२) भादवी तसेच कलम ४, ६ बाल लैंगीक अत्याचार अधिनियम २०१२, कायदयान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस २४ जानेवारी २०१८ रोजी रात्रो २१.०० वा अटक करून तपास पूर्ण करून आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करुन स्पेशल पोक्सो नुसार खटला विषेश न्यायालयात चालवुन, फिर्यादी व वैद्यकीय पुरावा, ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राहय धरून आज १५ डिसेंबर २०२३ रोजी आरोपी अनिल बाजीराव मडावी ( ४८) रा. मोहली ता. धानोरा जि. गडचिरोली यास विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तम एम. मुधोळकर गडचिरोली यांनी कलम ३७६ (२) (१), ५०६ (२) भादवी तसेच कलम ४,६ बाल लैंगीक अत्याचार अधिनियम, मध्ये दोषी ठरवुन २५ वर्षे सश्रम कारावास व एक लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावली दंडाची रक्कम पीडीतेला देण्याचा आदेश पारित करण्यात आला. दंड न भरल्यास १ वर्षे ३ महीने वाढीव शिक्षेची तरतुद करण्यात आली.
सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल एस. प्रधान यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा प्रथम तपास पोउपनि हिम्मतराव सरगर व अंतिम तपास पोनि / विजय पुराणीक पोस्टे धानोरा यांनी केला. तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता सेशन कोर्ट पैरवी अधिकारी व अंमलदार यांनी कामकाज पाहीले.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news, dhanoraz kurkheda, korchi, armori, chamorshi, aheri, sironcha, District Cort Gadchiroli)