खळबळजनक : सोडे आश्रमशाळेतील आणखी १७ विद्यार्थ्यांना विषबाधा, आकडा पोहचला १२३ वर

1025

– विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या पोहचली १२३ वर
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.२१ : तालुक्यातील सोडे येथील शासकीय कन्या आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या १०६ मुलींना दुपारच्या जेवणातून विषबाधा झाल्याची घटना बुधवार २० डिसेंबर २०२३ ला दुपारी घडली. या घटनेने जिल्हाभरात खळबळ उडाली. तर आज २१ डिसेंबर रोजी आणखी १७ मुलींना विषबाधा झाक्याचे उघडकीस आले असून त्यांना रुग्णालयात उपचारकरिता दाखल करण्यात आले आहे. आता एकूण विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १२३ वर पोहचली आहे त्यामुळे तालुक्यासह जिल्हाभरात खळबळ माजली आहे.
धानोरा तालुक्यातील सोडे येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय आहे. आश्रम शाळा असल्याने विद्यार्थी निवासी राहतात. शाळेत १ ते १२ वीपर्यंत वर्ग असुन त्यात एकूण ३६९ विद्यार्थी शिक्षण घेतात. २० डिसेंबरला दुपारच्या जेवणात विद्यार्थ्यांना कोबी, वरण भात व गाजर खाल्ल्यानंतर काही विद्यार्थ्यांना डोकेदुखी, मळमळ असा त्रास जाणवू लागला त्यामुळे तब्बल १०६ विद्यार्थ्यांना रुग्णालयात भरती करावे लागले. दरम्यान आज २१ डिसेंबरला सकाळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना नाष्त्यात वटाण्याची उसळ दिली होती. ती खाल्ल्यानंतर आणखी १७ विद्यार्थ्यांना मळमळ, डाकेदुखी असा त्रास सुरु झाल्याने तातडीने धानोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात ४७ विद्यार्थ्यांवर उपचार सुरु असून उर्वरित ७६ जण धानोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यामुळे आता एकूण विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा १२३ वर पोहचला असून विषबाधा झालीच कशी ? याबाबत चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी पालक वर्गाकडून केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here