– न्याय करीता ना. वडेट्टीवार यांना निवेदन
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि.२१ : शहरातील शासकीय घरकुल योजने लाभाकरीता जागेचा नमूना ८ व टॅक्स पावती हा पूरावा ग्राह्य माणण्यात यावा याकरीता शासनस्तरावर पाठपूरावा करावा या मागणी करीता येथील शिष्टमंडळाने आज ब्रम्हपूरी येथे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आ.विजय वडेट्टीवार यांची भेट निवेदन दिले
कुरखेडा नगर पंचायत हद्दीत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभ मिळण्याकरीता अनेकांनी अर्ज सादर केले आहेत मात्र येथे वर्षानूवर्षापासून निवास असतानाही येथील २६५ अर्जदारांचे प्रस्ताव निवासी जागेचा सबळ पूराव्या अभावी नाकारण्यात आले आहे. वास्तविक ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ नमूना ८ व घर टॅक्स पावती वर देण्यात येत आहे मात्र शहरी भागात तो नाकारण्यात येत असल्याने येथील अनेक लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित होत असल्याने त्यांचावर अन्याय होत आहे. येथील अनेक अर्जदारांचे येथे ७० ते ७५ वर्षापासून निवास असतानाही जागेचा सबळ पूरावा मागण्यात येत असल्याने ते हतबल झालेले आहेत त्यामूळे आपल्या स्तरावरून शासनाकडे पाठपुरावा करीत वंचित लाभार्थाना न्याय मिळवून द्यावा व जागेचा पुराव्या करीता नमूना ८ व घर टॅक्स पावती हा पुरावा ग्राह्य धरण्याकरीता शासनाला बाध्य करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देताना काँग्रेस पक्षाची महिला तालूका अध्यक्ष आशाताई तुलावी, काँग्रेस तालुका अध्यक्ष जिवन पाटील नाट, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे, माजी जि.प सदस्य प्रभाकर तुलावी, माजी पं. स. सभापती गिरीधर तितराम, संगीता मडावी, राधाबाई गुवाल, रमशिला गुवाल, कपील पेंदाम, सिराज पठान आदि हजर होते.