– दोघेजण जखमी
The गडविश्व
नागपूर, दि.२५ : गॅस फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट झाल्याने सिलेंडर चार वर्षीय चिमुकल्याचा अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्रो साडेआठ वाजताच्या सुमारास नागपूर येथील व्हीसीए मैदान परिसरात असलेल्या चर्चसमोर घडली. घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. सिझान आसिफ शेख (वय ४) रा. मानकापूर असे मृत चिमुकल्याचे नाव तर फारिया हबीब शेख (२८) व अनमता हबीब शेख (२४) रा.मोहम्मद मशीदजवळ मानकापूर अशी जखमींची नावे आहेत.
ख्रिसमस असल्याने सदर परिसरातील चर्चसमोर खरेदीसाठी दुकाने लावण्यात येतात. सिझानही आपल्या नातेवाईकांसह तिथे आला होता. सदर ठिकानी फुगेवाले दिसल्याने त्याने फुग्यासाठी आग्रह केला. वडिलांनी मुलाच्या हट्टापोटी त्याला फुगा घेऊन देण्यासाठी घेऊन गेले. दरम्यान फुग्यात गॅस भरत असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे सिलिंडर हवेत उडाले आणि सिझान शेखच्या अंगावर कोसळला यात सिझानचा मृत्यू झाक्याचे समजते. तर आरिया व अनामत या काही प्रमाणात भाजले गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व जखमींना उपचारासाठी मेयोत दाखल केले.सदर घटनेनंतर विक्रेता पसार झाल्याचे कळते. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिस फुगे विक्रेत्याचा शोध घेत आहे.