माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांची काँग्रेस मध्ये एन्ट्री

246

– विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
The गडविश्व
आलापल्ली, दि. २५ : गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे प्रमुख तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी नुकतीच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस मध्ये एन्ट्री केली आहे. त्यांच्यासह अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, मुलचेरा, सिरोंचा,भामरागड, एटापल्ली या पाच तालुक्यातील आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे पाच तालुक्याचे आविसं अध्यक्ष, सरपंच, नगर पंचायत अध्यक्ष आणि माजी सरपंच, उपसरपंच, सदस्यसह अहेरी विधानसभा क्षेत्रातील आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने काँग्रेस मध्ये प्रवेश केले. २४ डिसेंबर ला आलापल्ली येथे भव्य प्रवेश आयोजित करण्यात आला होता.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत आलापल्ली येथे भव्य काँग्रेस पक्षप्रवेश २४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आदिवासी विद्यार्थी संघटनेचे अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्व नेते-कार्यकर्त्यांचे पक्षांतर झाल्याने या विषयी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. आता या प्रकरणावरून आविसं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव वाढल्याची चिन्ह आहेत.
माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कंधेसमर्थक व कट्टर म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्हा परिषदचे माजी जिप अध्यक्ष अजय कंकडालवार व सिरोंचा आविसं तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम अहेरी विधानसभा क्षेत्रातील आविसं चे कट्टर समर्थक समजले जाणारे आणि त्यांचे कुटुंबीय आदिवासी विद्यार्थी संघटना पक्षामधून राजकारण करत होते. अखेर आदिवासी विद्यार्थी संघटनेचे माजी जि.प अध्यक्ष अजय कंकडालवार व अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्यातील आविसं चे तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते अनेक सरपंच व उपसरपंचसह आविसंला सोडचिठ्ठी देत २४ डिसेंबर रोजी भारतीय काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची घोषणा त्यांनी केली.
आपल्या काँग्रेस पक्षातील प्रवेशाबाबत माहिती देताना अजय कंकडालवार म्हणाले, “अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्यासह ग्रामीण भागाच्या विकासासाठी आम्ही काम करत असून अजूनही काम करायचे आहे. महाविकास सरकार असताना त्यासाठी निधी व योजनांना मंजूरी दिली आहे. आणि त्यासाठी विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार यांनी आपल्याला मदत केल्याची आठवण अजय कंकडालवार यांनी केली.
आविसंचे अजय कंकडालवार व पदाधिकारी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या वाटेवर उघडपणे होते. विशेष म्हणजे अजय कंकडालवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व त्यांचे पत्नी माजी पंचायत समिती उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार आणि इंदाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच वैभव कंकडालवार आहेत.
“मी आणि माझा सर्व परिवार हा पिढीजात आविसंचे आहेत आणि होतो. पूर्वी आविसंचे पुढारी हे छोट्या मोठ्या सर्व कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहत असत आणि अडीअडचणी सोडवण्यासाठी देखील काम करीत असत पण मध्यंतरी काळातील पुढारी मात्र पक्ष वाढीसाठी नव्हे तर पक्ष संपवण्यासाठी काम करताय. आम्ही अहेरी विधानसभा क्षेत्राचा विकासासाठी अनेकदा आविसंच्या माजी आमदाराना अनेकदा जाऊन भेटलो पण काही उपयोग झाला नसून अहेरी विधानसभा क्षेत्राकडे त्यांचे लक्ष नसल्याचे,” आरोप माजी जि.प अध्यक्ष अजय कंकडालावर यांनी केले.
याविषयी बोलताना आदिवासी विद्यार्थी संघटनेचे एटापली तालुका अध्यक्ष मट्टमी म्हणाले, “आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढत होतो आणि आजही लढू अजयभाऊ यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून उत्तम निर्णय घेतला असून विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांच्या माध्यमाने आपल्या समस्या सोडवू आणि आपण जोमाने काम करणार.

माजी आमदार दीपक आत्राम यांना जोरदार धक्का बसणार

माजी आमदार दीपकदादा आत्राम यांचे कंधे समर्थक असलेले माजी जि.प अध्यक्ष अजय कंकडालवार व सिरोंचा तालुका अविसं अध्यक्ष बानय्या जनगाम आणि अहेरी विधानसभा क्षेत्रातील आविसंचे पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने अहेरी विधासभेत काँग्रेसचे पारडे जड झाले असून अहेरी विधासभेत माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना येणाऱ्या 2024 वर्षात आगामी निवडणुकीत धक्का बसणार असून काँग्रेसला नक्कीच फायदा होणार अशी चर्चा सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here