The गडविश्व
गडचिरोली, दि.२६ : स्थानिक विदर्भ इंटरनॅशनल स्कूल गडचिरोली येथे २२ डिसेंबर २०२३ रोजी श्री रामानुजन यांच्या जन्म दिवसानिमित्त जागतिक गणित दिवस तसेच क्रिसमस दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेचे पूजन करून झाले. या दिवसा प्रित्यर्थ वेगवेगळे कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आले. वर्ग सातवी ची विद्यार्थिनी वैष्णवी ताकसांडे हिने गणिताचे महत्त्व सांगितले. वर्ग दुसरीच्या विद्यार्थिनींनी शिक्षिका नूर सभा सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचे वेगवेगळे आकार यावर सुंदर असे नृत्य-नाट्य प्रस्तुत केले. तसेच गणित शिक्षक शुभम भोयर यांनी आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीत गणिताचे कसे महत्त्व आहे हे सांगितले. वर्ग पाचवी, सहावी, आठवीच्या विद्यार्थ्यांनी गणिताची सोडवणूक करताना कोणकोणत्या चिन्हांची गरज भासते हे कविता सादरीकरणातून पटवून दिले. त्यानंतर क्रिसमस दिनानिमित्त शिक्षिका रूपाली चावरे, वैष्णवी येवले व शिक्षक सुरज डोईझाड यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग पाचवी, सहावी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी येशू ख्रिस्त यांचा जन्म कसा झाला व ख्रिसमस का साजरा केला जातो यावर सुंदर असे नाट्य सादर केले. संगीत शिक्षक प्रणय मेटपल्लीवार व शिक्षिका सपना राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे कॅरोल गीत प्रस्तुत केले. तसेच वर्ग तिसरीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षिका मोनाली नागापुरे यांचे मार्गदर्शनाखाली क्रिसमस दिनावर नृत्य सादर केले. वर्ग सातवी चा विद्यार्थी आदित्य चंद्रिकापुरे आणि चौथीचा छायांक नरोटे यांनी सांता बनवून सर्वांना भेटवस्तू दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अलका निसार मीसार व सातवीच्या विद्यार्थिनी आरोही बांबोडे तसेच विधी काटेंगे तर आभार शिक्षिका सायली पायाड हीने मानले. ख्रिसमस दिनानिमित्त वर्ग पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी क्राफ्ट तारा बनवणे, उपहार सॉक्स सजविणे व क्रिसमस चे झाड सजवणे असे अनेक उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उत्तम कलाकृतीला पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रशांती वाघमारे व संघ, तसेच सर्व गणित शिक्षक कार्यरत होते. सदर कार्यक्रमात शाळेच्या प्राचार्या नेहारिका मंदारे तसेच शाळेच्या प्रशासकीय अधिकारी प्रीती मुंडे उपस्थित होत्या.