The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २७ : गुरुदेव दत्त जयंती निमित्त 26 डिसेंबर रोजी धानोरा येथे वाजत गाजत दत्ताची पालखी काढण्यात आली.
हि पालखी संपूर्ण गावातून फिरवण्यात आली. महिला पुरुषांनी पालखी थांबवून पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. पालखीमुळे धानोरा नगरी भक्ती भावाने दुमदुमून गेली. श्री गुरुदेव दत्त बहुउद्देशीय विकास संस्था उत्सव समिती यांच्या तर्फे दत्त मंदिरात दत्त जयंती उत्साहात साजरी केली जाते. गुरुदेव दत्त भजन मंडळ खैरी व गुरुदेव दत्त भजन मंडळ धानोरा यांच्या भजन कीर्तन चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सकाळी संपूर्ण गावातून दत्ताची पालखी फिरवण्यात आली. सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता सचिन हेमके, सखाराम लेनगुरे, अध्यक्ष विश्वनाथ नैताम, उपाध्यक्ष जगदीश मडावी व गावकरी यांनी सहकार्य केले.