– जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टिमकडून प्रात्यक्षिकाद्वारे दाखविण्यात आले पुर परिस्थितीवरील उपाययोजना
The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : राष्ट्रीय पोलीस मिशन अंतर्गत गृह मंत्रालय, भारत सरकार यांचेद्वारा सन २०१८ पासून राष्ट्रीय स्तरापर “स्टुडंट पोलीस कैडेट प्रोग्राम” राबविला जात असल्याने या उपक्रमांतर्गत इयत्ता ०८ वी व ०९ ची मधील विद्यार्थ्यांकरीता आंतरवर्ग, बाह्यवर्ग आणि क्षेत्रीय भेटी आयोजीत करुन विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व व नितीमत्ता विकासाला उपयुक्त असे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कला-गुणांना वाव मिळत असून त्यांच्यात सामाजिक जाणीवा प्रगल्भ होऊन व्यक्तीगत हिताईतकेच सामाजिक जबाबदारीचे भान वाढीस लागत आहेत. तसेच या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना नितीमुल्यांचे महत्व शिकविले जात असून समाजातील भ्रष्टाचार आणि वाईट चालीरितींचा मुकाबला करण्यासाठी तयार केले जात आहे. यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संयम, सहनशिलता, शिस्त व सकारात्मक दृष्टीकोन इ. नैतिक प्रामाणिकपणा मुल्यांची जडणघडण होण्यासाठी व त्याच्या सर्वागीन विकासात भर पडावी या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलातर्फे २६ ते ३० डिसेंबर पर्यंत एनसीसीचे थर्तीवर पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे स्टुडंट पोलीस कैडेट उपक्रमांतर्गत पाच दिवसीय “निवासी प्रशिक्षण शिबीराचे” आयोजन करण्यात आले आहे.
या पाच दिवसीय आयोजीत शिबीरामधील आज चौथा दिवस असून, आज २९ डिसेंबर २०१३ रोजी सकाळी पथसंचलन सराव करण्यात आले, त्यानंतर कमांडो ट्रेनिंग सेंटर किटाळी येथे पोलीस विभागातील अत्याधुनिक हत्यांराबाबत शस्त्र प्रदर्शनाद्वारे माहिती देण्यात आली, तसेच विद्याख्याँच्या शारीरिक क्षमता वाढपिण्यासाठी ट्रॅकींग करण्यात आले, यासोबतच एन. डी. आर.एफ चे पोलीस निरीक्षक ईश्वर मते व जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे, कृष्णा रेड्डी व त्यांच्या संपूर्ण टिमने पुर परिस्थिती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापन व निवारण दल कशा पद्धतीने लोकांना मदत करतात याचे वैनगंगा नदीवर प्रात्यक्षिक करुन दाखविले. यामध्ये बोटी, लाईफ सेव्हिंग जॅकेट व पीसीआर इत्यादी पद्धतीचा अवलंब करुन पुरात अडकलेल्या नागरिकांना सुखरुप कशाप्रकारे बाहेर काढण्यात येते याबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्यांनतर पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर सहायक अग्निशामक अधिकारी (न.प.) गडचिरोली अनिल गोवर्धन व त्यांच्या टिमने प्रात्यक्षिकाद्वारे अग्निशामक दल हे एखादया ठिकाणी आग लागल्यानंतर कशाप्रकारे आगीवर नियंत्रण मिळवून आगीत अडकलेल्या लोकांची मदत करतात याबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले, यासोबतच विदयार्थ्यांनी स्वतः प्रात्याक्षिक करुन अनुभव घेताला. त्यानंतर मोटार वाहन निरीक्षक श्री. किरण शिंदे यांनी सुरक्षा व रहदारी जागरुकता या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच नक्षलवाद विरोधात विद्यार्थ्यांची भूमीका या विषयावर मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख सा. यांनी मार्गदर्शन केले. तसेच वक्तृत्व, गायन, समूह नृत्य, वाद- विवाद व समाजातील दृष्ट चालीरीती या विषयावर पथनाट्य, असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
सदर कार्यक्रम मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख सा., व अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम रमेश सा. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि, धनंजय पाटील, पोउपनि, भारत निकाळजे तसेच सर्व पोलीस अंमलदारांनी विशेष परीश्रम घेतले.