केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नीट पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलली

365

The गडविश्व
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयने नीट पदव्युत्तर पदवीसाठीची परीक्षा स्थगित केली आहे. सदर नीटची परीक्षा 12 मार्च रोजी होणार होती. आता ही परीक्षा सहा ते आठ आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा मे-जून महिन्यात होण्याची शक्यता आहे.
NEET PG 2022 (NEET PG 2022 Exam Date) च्या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर 7 फेब्रुवारी 2022 रोजी सुनावणी होणार होती. NEET PG ची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी म्हटले की, कोविड महासाथीमुळे त्यांना आंतरवासियता (Internship) पूर्ण करता आली आहे. त्यासाठी त्यांना थोडा वेळ हवा होता. ही इंटर्नशिप पूर्ण करण्यासाठी 31 मे 2022 ची मुदत देण्यात आली होती.
सुप्रीम कोर्टात धाव घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिकेद्वारे म्हटले की, कोरोना महासाथीच्या आजारात सुरू असलेल्या कर्तव्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना इंटर्नशिप पूर्ण करता आली नाही. इंटर्नशिप पूर्ण न केलेले विद्यार्थी NEET PG परीक्षेला मुकले असते. त्यामुळे ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here