गडचिरोली : हत्ती मृत्यू प्रकरणी ‘त्या’ शेतकऱ्यास १४ दिवसांची कोठडी

1182

– वाढोणा येथे विद्युत प्रवाहाने हत्तीचा मृत्यु
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. ०३ : जिल्हातील वडसा वनविभागांतर्गत येणाऱ्या कुरखेडा तालुक्यातील वाढोणा येथील शेतपिकाच्या कुंपनातिल विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने रानटी हत्तीचा मृत्यू झाल्याची घटना ३१ डिसेंबर २०२३ रोजी घडली होती. याप्रकरणी विद्युत प्र्रवाह सोडणाऱ्या शेतकऱ्यास हत्तीच्या मृत्यूस जबाबदार ठरवत अटक करून १ जानेवारी रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवासांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
जिल्हयात रानटी हत्तीचा कळप दाखली झाला आहे. त्याव्दारे शेतपिकांचे नुकसान, घरांची पडझड व वर्षभरात चार जणांचा मृत्यु झाला आहे. ३१ डिसेंबरच्या पहाटे रानटी हत्तीचा कळप कुरखेडा तालुक्यातील वाढोणा परिसरात दाखल झाला. दरम्यान शेतकरी कृष्णा नारनवरे यांनी शेत पिकाच्या रक्षणासाठी लावलेल्या विद्युत प्रवाहात कळपातील मादा हत्ती अडकली आणि विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने तिचा जागीच मृत्यु झाला. घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली असता घटनास्थळी गावकरी व वनकर्मचारी दाखल झाले होते. काही काळ तनाणवाचे वातावरण पहावयास मिळाले होते. दरम्यान हत्तीच्या मृत्यस शेतकरी कृष्णा नारनवरे यांना जबाबदार धरून त्याच्यावर गुन्हा दाखल करून १ जानेवारी रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सदर हत्तीचा कळप हा आता शिरपूर जंगल परिसरात असल्याची माहिती असुन वनविभाग हत्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवून असल्याचेही कळते. कोणतीही अनुचित घटना घडु याकरिता नागरिकांना जंगल परिसरात विशेष करून हत्ती दिसल्यास त्यास विडवू नये असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here