गडचिरोली : तो पुन्हा आला, सरपण गोळा करत असतांना वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

2079

– जिल्हा मुख्यालयानजीकची घटना
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : जिल्हा मुख्यालयापासुन जवळच असलेल्या वाकडी जंगल परिसरात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ३ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. मंगलाबाई विठ्ठल बोळे (वय ५५) रा. वाकडी ता.जि. गडचिरोली असे मृतक महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक मंगलाबाई ही आपल्या मुली व इतर महिलांसोबत वाकडी गावापासुन अर्धा किलोमिटर अतंरावरील जंगल परिसरात सरपण गोळा करण्यासाठी गेली होती. दरम्यान मायलेकी सरपण गोळा करण्यात व्यस्त असतांना झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने मंगलाबाई यांच्यावर हल्ला चढवला. जोरात ओरडल्यानंतर मुलगी व इतर महिलांनी त्याकडे धाव घेतली तेव्हा मंगलाबाई वाघाशी झुंज देतांना दिसुन आल्या मात्र वाघाने त्यांच्या गळयावर पंजाने हल्ला केल्याने रक्तस्त्राव होवून त्यांचा जागीच मृत्यु झाला. महिलांनी आरडाओरड केल्याने वाघाने धुम ठोकली. घटनेची माहिती गावातील व्यक्तींना देण्यात आली असता गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच वनविभागाचे अधिकारी तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
मुलीने आपल्या डोळयादेखत वाघाने आईला ठार केल्याचा थरार तिने बधितला. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ३० डिसेंबरला बोधली येथे वाघाने हल्ला करून मंदाबाई कोठारे या महिलेस जखमी केले होते. बोधली आणि वाकडी येथे हल्ला करणारा वाघ एकच असावा असा कयास लावण्यात येत असुन वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणीही सुरू आहे.
(the gadvishva, the gdv, gadchiroli, tiger attack women, wakadi forest)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here