मानेमोहाळी ग्रामपंचायतीला पुन्हा एक बहुमान : ‘हर घर जल’ गाव घोषीत

340

– चिमुर तालुक्यातील 100 टक्के नळ जोडणी करणारे ठरले प्रथक गाव
The गडविश्व
चिमुर : तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेले मानेमोहाळी हे छोटेस गाव ‘हर घर जल’ गाव घोषीत करण्यात आले आहे. ‘हर घर जल’ गाव असा मान मिळणारा तालुक्यातील पहिला मान मानेमोहाळी गावाला मिळाले आहे. काल 3 फेब्रूवारी रोजी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन व पाणी पुरवठा विभाग पंचायत समिती यांच्या विद्यामाने सदर गाव ‘हर घर जल’ गाव घोषीत करण्यात आले.
मानेमोळाळी गावात मागील काही वर्षाअगोदर पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई जाणवत होती. पिण्याच्या पाण्याकरिता गावाबाहेर जावे लागत होते. ग्रामपंचायत प्रशासनाने जल जिवन मिशन अंतर्गत गावात नळ योजना आणली. यावेळी गावातील नागरिकांचा या योजनेला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. आज गावात जवळपास 100 टक्के नळ जोडणी झाली आहेे. मानेमोहाळी हे 100 टक्के नळ जोडणी करणारे तालुक्यातील एकमेव गाव ठरले आहे. यामुळे काल 3 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन व पाणी पुरवठा विभाग पंचायत समितीचे अधिकारी ग्रामपंचायत येथे भेट देवून गावास ‘हर घर जल’ गाव असे घोषीत केले.
यावेळी गावातील प्रथम नागरिक ग्रा.पं.सरपंच राजेंद्र कराळे, ग्रामसेवक मेश्राम, उपसरपंच निखील जिवतोडे, ग्रा.पं.सदस्या प्रतिभा खाटे, जिल्हा सरचिटणिस प्रविन खंडारे, सल्लागार साजिद निजामी, पाणी पुरवठा सल्लागार अंजली डाहूले, तालुका स्तरावरील उपअभियंता हेडाऊ, मंचमवार, करंजीकर, तालुका समन्वयक स्वच्छ भारत मिशन गणेश रामटेके, स्वप्नील आष्टनकर व गावातील महिला व पुरूष मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here