The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.०४ : तालुक्यातील निमगांव येथिल गणेश अलंकार विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती बालिका दिन म्हणून ३ जानेवारीला साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बिल.डब्लु.सावसाकडे हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरिक लालाजी नगराळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक दिवाकर भोयर, नागदेवते, कुमारी भारती श्रीरामे, शिवणकर, गेडाम लोहारे उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी सुद्धा सावित्रीबाई फुले यांच्या जयंती विषयी व महिलांसाठी केलेले कार्य याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. शाळेत रांगोळी स्पर्धा व भाषण स्पर्धा घेण्यात आली यात रांगोळी स्पर्धेत वर्ग दहावीचा विद्यार्थी रीतिक शिडाम याने प्रथम क्रमांक पटकावला तर भाषण स्पर्धेत नृपिया पंढरी सुरपाम हिने प्रथम क्रमांक मिळविला. कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन राणी खोब्रागडे तर आभार धनश्री लाकुडवाहे हीने मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
