– वनविभागात उडाली खळबळ
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०५ : रस्ता कामावरील पकडलेली ट्रक्टर सोडण्याकरीता व आकारलेला दंड आकारून कमी करण्याकरीता १० लाखांची मागणी करून तडजोडीअंती ५ लाख रूपयांची लाच स्विकारतांना पेरतिलीचे वनपरिक्षेत्र प्रमोद आनंदराव जेनेकर (३८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडल्याची कारवाई गुरूवार ४ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आली. सदर कारवाईने वनविभागात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यास तुमरगुडा ते कासमपल्ली रस्त्याच्या कामावरील ट्रक्टर सोडण्याकरीता व ७२ लाख रूपयांचा दंड आकारून ते कमी करून ५ लाखपर्यंत करण्याकरीता वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेनेकर यांनी दहा लाख रूपयांच्या लाच रकमेची मागणी केली. तक्रारदार यांना सदर लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथे तक्रार दाखल केली. पोलीस उपअधिक्षक श्रीमती अनामिका मिर्झापूरे यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले लाप्रवि गडचिरोली यांनी तक्रारीच्या आधारे गोपनीयरित्या शहनिशा करून सापळा करवाईचे आयोजन करून त्यात वनपरिक्षेत्र अधिकारी जेनेकर यांनी तक्रारदारास रस्ता कामावरील पकडलेली ट्रक्टर पकडून ते सोडण्याकरीता व आकारलेला दंड कमी करण्याकरीता १० लाख रूपयांच्या लाच रकमेची पंचासमक्ष मागणी केली व तडजोडीअंती ५ लाख रूपयांची लाच रक्कम स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. यादरम्यान जेनेकर यांच्या पेरमिली येथे राहत असलेल्या शासकीय निवासस्थानी झडती घेतली असता ८५ हजार रूपये रोख मिळुन आल्याने ते सुध्दा जप्त करण्यात आली. याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याविरूध्द पोलीस स्टेशन पेरमिली येथे भ्रष्टाचार कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाा आहे.
सदर कारवाई नागपूर लाप्रवि पोलीस अधिक्षक राहुन माकणीकर, अपर पोलीस अधिक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली लाप्रवि पोलीस उपधिक्षक श्रीमती अनामिका मिर्झापूरे, पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, सफौ. सुनिल पेद्दीवार, नापोशि किशोर जौजारकर, पोशि संदीप घारेमोडे, संदीप उडाण व चापोहवा नरेश कस्तुरवार यांनी केली.
सदर कारवाईने वनविभागात खळबळ उडाली असुन रस्ता कामावर अवैधरित्या जंगल पसिरातील मुरूमाचा वापर होत होता असे कळते. त्यामुळे जिल्हाभरातील किती रस्ता कामात अवैधरित्या मुरूमाचा वापर होत आहे हा सुध्दा संशोधनाचा प्रश्न असुन आता त्या तक्रारदारवरही काय कारवाई होते याकडे सुध्दा लक्ष लागले आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news, aheri, alapalli, permili, forest, acb maharashtra, RFO, acb trapd, chamorshi, dhanora, armori)