The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि.०७ : मराठी पत्रकारितेची पायाभरणी करणारे दर्पणकार आचार्य आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मराठी पत्रकार दिन म्हणून तालूका पत्रकार संघ कूरखेडा व संस्कार पब्लिक स्कूल कूरखेडा यांचा वतीने विविध उपक्रम राबवित साजरा करण्यात आला.
यावेळी तालूका पत्रकार संघाच्या कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करीत नगरसेवक तथा भाजपा अनुसूचित जाति आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अॅड उमेश वालदे यांचा हस्ते प्रतिमेला पूष्पहार अर्पन करण्यात आले व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जिवन कार्याची आढावा सादर करण्यात आला तसेच संस्कार पब्लिक स्कूल कूरखेडा येथे मराठी पत्रकार दिनानिमीत्य लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले शहरातील पत्रकारांना महापुरुषांच्या जिवन कार्याची माहीती असलेली पूस्तीका व लेखनी भेटवस्तू व पूष्पगूच्छ देत सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तालूका पत्रकार संघाचे अध्यक्ष सिराज पठान, सचिव नसीर हाशमी, उपाध्यक्ष विजय भैसारे’ कोषाध्यक्ष प्रा.विनोद नागपूरकर, विजय लाडे, शाम लांजेवार, राकेश चव्हाण, कैलाश उईके, चेतन गहाने, ताहीर शेख, शालीकराम जनबंधू, दिपक धारगाये आदि हजर होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रा.नागेश्वर फाये यांनी केले तर संचालन व आभार शिक्षीका कोमल निरंकारी यांनी मानले.