– सर्जरी केअर फांऊडेशन नागपूर व वन जन हक्क फौडेशनच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाने),०८ : सर्जरी केअर फांऊडेशन नागपूर व वन जन हक्क फौडेशन यांचा संयुक्त विद्यमाने शहरातील जि प शाळेचा पटागंणात रविवार ७ जानेवारी रोजी दुपारी १२ ते ५ वाजेदरम्यान मोफत सर्जिकल निदान व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात १४७ रुग्णांची तपासणी करीत सर्जरी ची गरज असलेल्या रुग्णांना संदर्भित करण्यात आले.
शिबीरात क्लबफूट (जन्मजात आजार) चे मोठ्या प्रमाणात रुग्णांची तपासणी करीत आजाराचे निदान करण्यात आले. क्लबफूट च्या रुग्णांची शस्त्रक्रिया नागपूर येथे फाउंडेशन वतीने मोफत करण्यात येणार आहे. यावेळी कार्यक्रमाचा प्रस्तावणा करताना सर्जरी केअर फांऊडेशन चे संस्थापक संचालक विनय जावळे व वन जन हक्क फाउंडेशन चे संचालक डॉ. केशव वाळके यांनी संस्थेचे उद्देश्य व गरीब गरजू रुग्णांकरिता राबविण्यात येणारी औषधोपचार सेवा तसेच मोफत करण्यात येणारे शस्त्रक्रिया शिबीरे याची माहिती दिली. डॉ. आशिष कोरेटी यांनी आदिवासी दूर्गम भागातील नागरिकांचा सोई सुविधा अभावी आजाराचे निदानच होत नसल्याने उपचार होत नाही व त्यांना शारीरिक मानसिक कष्ट सहन करावे लागते या वंचित घटकाना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा याकरीता दूर्गम भागात फाऊंडेशनच्या माध्यमाने रुग्ण सेवा करण्यात येत आहे. आवश्यक रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. शिबीरात डॉ.केशव वाळके, डॉ. आशिष कोरेटी, डॉ. प्रशिल उईके तालुक्यातील आशा वर्कर यांनी सेवा बजावली तर यशस्वीतेकरीता सर्जरी केअर फांऊडेशनचे विनय जावळे, सागर देशमुख, नईम दिवान यांनी सहकार्य केले.