The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.०९ : पत्रकार दिनानिमित्तने धानोरा शहरातील कँन्सरग्रस्त व्यक्तीची भेट घेऊन त्याची आस्थेने चौकशी करून त्यांना आदर्श पत्रकार संघ धानोराच्या वतिने ब्लँकेट भेट देण्यात आले.
धानोरा शहरातील दिपक रेमाजि भैसारे (वय ५८) यांना सुरुवातीला कँन्सर रोगाने व्यापले नंतर अर्धांगवायू (लकवा) मारला. या व्यक्ती ची पत्रकारानी भेट घेऊन ६ जानेवारी २०२४ ला ब्लाँकेट देण्यात आले. यावेळी आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष समिर कुरेशी, उपाध्यक्ष दिवाकर भोयर, सचिव भाविकदास करमणकर, बंडू हरणे, देवराव कुंनघाडकर, ओम देशमुख, बाळू बोरकर, शरीफ कुरेशी आदि मान्यवर उपस्थित होते.