The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. १० : तालुक्यातील ग्रामपंचायत मुरुमगाव सभागृहात ८ जानेवारी २०२४ रोजी वाईस ऑफ मिडीया तालूका पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव येथील रूग्णांना फळ आणि बिस्किट वाटप करण्यात आले. त्या नंतर लगेच मुरुमगाव ग्रामपंचायत सभागृहात मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मो.शरीफ भाई कूरैशी जिल्हा उपाध्यक्ष व तालूका अध्यक्ष वाईस ऑफ मिडीया तालूका धानोरा, दिप प्रज्वलन- ललितजी बरछा उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती नगर पंचायत धानोरा यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथि म्हणून सरपंच शिवप्रसाद गवरणा ग्रामपंचायत मुरुमगाव, माजी सभापती अजमन राऊत पचांयत समिति धानोरा, सभापती नरेशजी चिमूरकर आरोग्य व स्वच्छता नगर पंचायत धानोरा, सरपंच शेवंताताई हलामी ग्रामपंचायत पन्नेमारा, भाजपा तालूका अध्यक्ष सौ.लताताई पूगांटे, हिरेन हालदार प्रतिष्ठित व्यापारी मुरुमगाव, मिटूं अभिमन्यू दत्ता प्रतिष्ठित व्यापारी मुरुमगाव, मुख्याध्यापक महेंद्र जांभूळकर स्व. रामचंद्र दखने विद्यालय मुरुमगाव, पोलीस निरीक्षक सिरसाट पोलीस मदत केन्द्र मुरुमगाव, वैद्यकीय अधिकारी डॉ.राहूल बनसोड प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव, क्षेत्र साहाय्यक देशपांडे वनपरिक्षेत्र कार्यालय पक्षिम मुरुमगाव, समीर कूरेशी अध्यक्ष आदर्श पत्रकार संघ धानोरा, मुख्याध्यापक रामटेके जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केन्द्र शाळा मुरुमगाव, माजी ग्रामपंचायत सदस्य मूनिर शेख मुरुमगाव, आदि मान्यवर उपस्थित होते.
तसेच वाईस ऑफ मिडीया संघटना तालूका धानोरा येथील सर्व पत्रकार तालूका उपाध्यक्ष भाविकदास करमनकर, तालूका सरचिटणीस देवराव कूनघाडकर, सह-सरचिटणीस सिताराम बळोदे, कार्यवाहक श्रावण देशपांडे, संघटक बंडू हरणे, प्रसिद्ध प्रमुख ओम देशमुख, मारोती भैसारे, बालकृष्ण बोरकर, इत्यादी उपस्थित होते.
वाईस ऑफ मिडीया तालूका धानोरा अतंर्गत पत्रकार दिनानिमित्त आयोजन करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उपस्थित उपाध्यक्ष व बांधकाम सभापती ललितजी बरछा यांचे स्वागत सत्कार जिल्हा उपाध्यक्ष व तालूका अध्यक्ष मो.शरीफ भाई कूरेशी वाईस ऑफ मिडिया धानोरा यांनी शाल श्रीफल व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आले. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व राजकीय पक्षातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता, शिक्षक वर्ग, व्यापारी वर्ग, वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, गाव पाटील, पोलीस पाटील, व गावातील प्रतिष्ठित नागरिक व उपस्थित संपूर्ण पत्रकारांचे शाल श्रीफळ व आकर्षक भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आले.
पत्रकार दिनानिमित्त प्रास्ताविक बालकृष्ण बोरकर यांनी केले तर पोलीस अधिकारी सिरसाट, नगर पंचायत उपाध्यक्ष ललितजी बरछा, अजमन राऊत, सौ.लताताई पूगांटे, सरपंच शिवप्रसाद गवरना मुरुमगाव, सरपंच शेवंताताई हलामी, मूनिर शेख मुरुमगाव,अध्यक्ष मो.शरीफ भाई कूरेशी यांनी मार्गदर्शन केला. कार्यक्रमाचे संचालन ओम देशमुख यांनी केले तर आभार पत्रकार सिताराम बडोदे यांनी मानले.