The गडविश्व
ब्रह्मपुरी, दि.१२ : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीस ट्रकने चिरडून अपघात झाल्याची घटना आज १२ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास शहरातील नेवजा बाई हितकारणी कन्या विद्यालय गेट समोर ते बाजार समितीच्या गाळे बांधकाम केलेल्या मोडीजवळ घडली. समीक्षा संतोष चहांदे (वय अंदाजे १७) रा.मालडोंगरी असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे.
मिळालेल्या महितीनुसार, समीक्षा ही नेहमीप्रमाणे ती आज महाविद्यालयात जात होती. ट्रक येत असल्याचे बघून तीने बाजूला होण्याचा प्रयत्न केला असता अरुंद रस्ता व रस्त्यावर खड्डे असल्याने रस्त्यावरून बाजूला होण्याच्या नादात तिची सायकल स्लिप होऊन ती ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने हा अपघात झाला असल्याचा अंदाज बांधण्याचे येत आहे. ट्रकने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी गर्दी केली होती. तर पोलिसांना माहिती देताच घटनास्थळ गाठून ट्रक चालकाला व ट्रक ल ताब्यात घेतले व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहे.
सदर घटनेने मृतक मुलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.