The गडविश्व
गडचिरोली, दि.१२ : महाराष्ट्र शासन राजकीय आणि सेवा विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी, गडचिरोली यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन सन २०२४ या वर्षाकरिता संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याकरीता पुढीलप्रमाणे स्थानिक सुट्टया जाहीर करण्यात आले आहे. शुक्रवार ०९ ऑगस्ट २०२४ रोजी जागतिक आदिवासी दिन, मंगळवार ०३ सप्टेंबर २०२४ रोजी पोळा (दुसरा दिवस), गुरुवार ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी दिवाळी (नरक चतुर्दशी). असे जिल्हाधिकारी, गडचिरोली संजय मीणा यांनी कळविले आहे.