– शेतातील पोल कमी करण्यासाठी मागितली लाच
The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : वीज जोडणीकरीता पोलचे सर्वे करुन चार विद्युत पोल बसत असतांना ते कमी करुन ३ पोल केल्याचा मोबदला म्हणून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमी. आरमोरी (ग्रामीण) ता. आरमोरी जिल्हा गडचिरोली येथील वरिष्ठ तंत्रज्ञ महेंद्र डोमाजी बगडे, (वय ३६ ) (वर्ग-३) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दीड हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याची कारवाई १४ जानेवारी रोजी केली. या कारवाईने महावितरण विभागात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हे आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील असून ते शेतीचा व्यवसाय करतात. तकारदार यांच्या सोनपूर सर्व्हे क. २२ मध्ये वीज जोडणीकरीता पोलचे सर्वे करुन चार विद्युत पोल बसत असतांना ते कमी करुन ३ पोल केल्याचा मोबदला म्हणून वरिष्ठ तंत्रज्ञ महेंद्र डोमाजी बगडे यांनी तक्रारदारास पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान तकारदार यांना लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथील अधिकाऱ्यांना भेटुन तकार नोंदविली.
ला.प्र.वि. गडचिरोली च्या पोलीस उपअधिक्षक श्रीमती अनामिका मिर्झापूरे यांचे पर्यवेक्षणात पो.नि. शिवाजी राठोड यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले असता त्यामध्ये पडताळणी दरम्यान सोनपूर सर्व्हे क. २२ मध्ये वीज जोडणीकरीता विद्युत पोलचे सर्व्हे करुन चार विद्युत पोल बसत असतांना ते ३ पर्यंत कमी करुन दिल्याच्या मोबदला म्हणून वरिष्ठ तंत्रज्ञ बगडे यांनी पाच हजार रुपयांच्या लाचेची पंचसाक्षीदारासमक्ष सुस्पष्ट मागणी केली व तडजोडीअंती दीड हजारांची लाच रक्कम स्विकारतांना रंगेहाथ मिळून आल्याने त्यांचे विरूध्द पोस्टे, आरमोरी येथे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी बगडे यांचे आरमोरी येथील निवासस्थानाची लाप्रवी गडचिरोली चम्मुकडून झडती घेण्यात आली.
सदरची कार्यवाही लाप्रवी नागपूर पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम यांचे मार्गदर्शनात व पोलीस उपअधिक्षक श्रीमती अनामिका मिर्झापूर यांचे पर्यवेक्षणात पो.नि. शिवाजी राठोड, पोनि श्रीधर भोसले, पोहवा शंकर डांगे, पोना किशोर जौंजारकर, पोशि संदीप उडान, संदिप घोरमोडे, प्रविण जुमनाके व चापोना प्रफुल डोर्लीकर, सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांनी केलेली आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli, armori, mahavitran, MSCEB, crime news, nagpur ACB trpd)