गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेस वाघाचा धुमाकुळ ; हल्ल्यात महिला ठार

1381

– नागरिकांत दहशत
The गडविश्व
मुलचेरा, दि. १५ : गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात आता वाघाने धुमाकुळ माजवला असून कापूस वेचत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना एक संक्रांतीच्या दिवशी १५ जानेवारी २०२४ रोजा सायंकाळच्या सुमारास घडली. रमाबाई शंकर मुंजमकर रा. कोळसापुर ( वय ५५) असे महिलेचे नाव आहे.
मृतक रमाबाई ह्या घरलगत कापूस वेचणी करत होते. दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करत नरडीचा घोट घेत ठार केले. वाघाने हल्ला करून रामबाईस फरफटत लगतच्या जंगल परिसरात सुमारे २०० फूट फरफटत नेल्याचे कळते. सुरुवातीला घटनेबाबत कोणालाही कळले नव्हते. मृतक चा मुलगा आठवडी बाजार करून घरी परतला असता घरात आई कुठेही दिसून न आल्याने लगतच्या कापसाच्या शेतात त्याने जाऊन बघितले असता रक्ताने माखलेली साडी दिसून आली. घटनेबाबत गावकऱ्यांना माहिती होताच परिसरात शोधाशोध करतांना मृतदेहच आढळून आला. याबाबत वनविभागाला कळवताच वन कर्मचारी व पोलीस दाखल झाले. सदर घटनेने परिसरात दहशत पसरली असून नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे तसेच वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

(the gdv, the gadvishva, gadchiroli, tiger attack, etapalli, mulchera, )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here