The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि.१७ : आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था द्वारा संचालित संस्कार पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तथा श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय व श्रीराम वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कला संस्कार वार्षिक महोत्सवाच्या आयोजना प्रसंगी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीराम कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील आजी माजी विस विद्यार्थ्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाच्या पवित्र कार्यात आजी-माजी विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केल्याने महाविद्यालयांशी जोडल्या गेलेले गुरु शिष्याचे ऋणानुबंध नाते यांची आठवण करून दिली.
रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेड्डीवार, आमदार कृष्णा गजबे, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, संस्था कोषाध्यक्ष तथा विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष वामनराव फाये, संस्था सचिव दोषहरराव फाये, गजानन येलतुरे, सिनेट सदस्य चांगदेव फाये, संस्था सहसचिव नागेश्वर फाये, प्राचार्य एल डब्लू बडवाईक, प्राचार्य देवेंद्र फाये, उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथील डॉ. जगदीश बोरकर, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली चे ब्लड बँकेचे राहुल वाळके, समता खोब्रागडे, मोनाली मारगाये, जीवन गेडाम, बंडू कुंभारे उपस्थित होते.
यावेळी प्रशांत भांडारकर, चेतन गहाने, नरेश मडावी, आकाश मस्के, राजकुमार गजपला, नितीन राऊत, लोकेश हटवार, दिवाकर देवांगन, लक्षित सोनटक्के, प्रमोद मुंगमोडे, नुकेश सहारे, मुसरफ सय्यद, लीलेश्वर दखणे, प्रणय मडावी, संकेत कुथे, सोमेश्वर मांडवे, देवेंद्र फाये, संजय शिरपूरवार या आजी-माजी विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.
यावेळी उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथील डॉ.जगदीश बोरकर, डॉ. प्राजक्ता दुपारे, रश्मी मोगरे धम्मप्रिया झाडे, टिकेश्वरी करमकार, मेगा वलथरे उपस्थित होते.
सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. विनोद नागपूरकर, क्रीडा प्रमुख ज्ञानेश्वर देशमुख, लिपिक स्वप्निल खोब्रागडे सर्व शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.