– स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : चंद्रपूर जिल्ह्यातून चारचाकी वाहनाने गडचिरोली शहरातील चिल्लर दारु विक्रेत्यांना देशी-विदेशी दारु व बियरचा अवैधरित्या पुरवठा करण्याकरीता मोठ्या प्रमाणात दारुची खेप आणणार असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने शासकीय विश्राम भवन, गडचिरोली जवळ मध्यरात्री सापळा रचुन नाकाबंदी दरम्यान वाहनासह ३ लाख ६२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोघांच्या मुसक्या आवळल्या. प्रफुल टिंगुसले, रा. गोकुळनगर, गडचिरोली , गणेश टिंगुसले, रा. ढिवर मोहल्ला, गडचिरोली असे आरोपींची नावे आहेत.
२१ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेला पोलीस स्टेशन, गडचिरोली हद्यीतील दारु तस्कर गोपाल बावणे, रा. ढिवर मोहल्ला, गडचिरोली हा त्याचे सहकऱ्यांच्या मार्फतीने चंद्रपुर जिल्ह्यातुन चारचाकी वाहनाने गडचिरोली शहरातील चिल्लर दारु विक्रेत्यांना देशी-विदेशी दारु व बियरचा अवैधरित्या पुरवठा करण्याकरीता मोठ्या प्रमाणात दारुची खेप आणणार आहे अशी गोपनिय माहिती मिळाली असता माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व कर्मचारी यांनी शासकीय विश्राम भवन, गडचिरोली जवळ २२ जानेवारी रोजीच्या रात्रो दरम्यान सापळा रचुन नाकाबंदी लावली असता संशयीत पांढऱ्या रंंगाचे मारोती सुझुकी कंपनीचे अल्टो वाहन हे येताना दिसले. पोलीसांनी त्यास थांबविण्याचा ईशारा दिला परंतू वाहन चालकानी पोलीसांच्या इशाऱ्यास न जुमानता वाहनासह पळ काढला. पोलीसांनीही क्षणाचाही विलंब न करता त्या वाहनाचा पाठलाग सुरु केला. अवैध दारु वाहतुक करीत असलेल्या वाहन चालकाने कारवाई टाळण्याकरीता त्यांचे ताब्यातील वाहन गडचिरोली शहराच्या दिशेने नेत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफिने सदर वाहनास अडवून वाहन चालक व त्याचा साथीदाराने पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीसांनी त्यांचाही पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. सदरच्या दारुच्या अवैध वाहतुकीत सहभागी असलेल गोपाल बावणे हा ही कार्यवाही सुरु असतांना अंधाराचा फायदा घेऊन दुचाकी वाहनाने फरार झाला. वाहनाची तपासणी केली असता, त्यात देशी दारुच्या 14 पेट्या, विदेशी दारुच्या 02 पेट्या, बिअरच्या 02 पेट्या व 2 लिटर क्षमतेचे विदेशी दारुचे 06 बंपर दिसुन आल्याने पोलीसांनी सदर दारुचा मुद्देमाल व वाहतुकीकरीता वापरलेले मारुती सुझुकी कंपनीचे अल्टो वाहन असे एकुण 3 लाख 62 हजार 400 रुपयाचा मुद्देमाल कारवाई करुन जप्त केला. याप्रकरणी पोस्टे गडचिरोली येथे कलम 65 (अ), 98 (2), 83 महा. दा. का. अन्वये आरोपी गोपाल बावणे, गणेश टिंगुसले व प्रफुल टिंगुसले यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कार्यवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) शयतिश देशमुख सा. व स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. राहुल आव्हाड, पोअं/प्रशांत गरुफडे, श्रीकृष्ण परचाके व चापोना/दिपक लोणारे यांनी केलेली आहे.